vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी…

मुंबई प्रतिनिधी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट (Tweet) करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे. संजय राऊत म्हणाले की, बार्बाडोस सारख्या देशात जिथे लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे तिथे 27 मंत्री आहेत. पण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही येथील मंत्रिमंडळात केवळ 2 जण आहेत. हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. संजय राऊत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा फोटोही शेअर केला आहे. राज्य घटनेनुसार चालत आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी राज्यपालांना केला

 

या केलेल्या ट्विटपूर्वी संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी घटनेच्या कलम 164-1A चा हवाला देत राज्य मंत्रिमंडळात 12 मंत्री असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

यापेक्षा कमी संख्या असेल, तर संविधान त्या मंत्रिमंडळाला मान्यता देत नाही. गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांनी (शिंदे-फडणवीस) घेतलेल्या निर्णयांची घटनात्मक वैधता नाही, असे संजय राऊत म्हणतात. राज्यपाल हे काय सुरु आहे?

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची दादर येथील आंदोलनात मागणी !मुंबईजवळील घारापुरी लेणीतील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्याचा अधिकार द्या

कृपया प्रसिद्धीसाठी ! लेख : दीपावलीचे अध्यात्मशास्त्र- सनातन संस्था–दीपावलीचे अध्यात्मशास्त्र 

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल, महत्वाची सूचना…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू· वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट· महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच..

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला  तुरुंगातून लवकर सुटका का होणार?

परळीतील महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

vishwatmaklokswamivarta