vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबईतील अंधेरीच्या 15 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला नायगावच्या निर्मनुष्य ठिकाणी ट्रॅव्हल बॅगेत; पोलिस तपास सुरू

मुंबईतील अंधेरीच्या 15 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला नायगावच्या निर्मनुष्य ठिकाणी ट्रॅव्हल बॅगेत; पोलिस तपास सुरू…

 

अल्पवयीन मुलीच्या खूना प्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस स्टेशन मध्ये अपहरणाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई मध्ये 15 वर्षीय मुलीचा मृतदेह बॅगेत आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंधेरी मधुन गुरूवारी बेपत्ता झालेली मुलगी शुक्रवारी दुपारी पालघर मधील नायगाव मध्ये मृतावस्थेत आढळली आहे. तिचा मृतदेह ट्रॅव्हल बॅग मध्ये आढळल्याने सार्‍या परिसरामध्ये खळबळ पसरली आहे. वाळीव पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राच्या वाराच्या खूना आहेत. विलेपार्ले परिसरामध्ये ही मुलगी सकाळी 11.45 च्या सुमारास अंधेरीवरून निघाली होती. संध्याकाळी 6 वाजून गेले तरी ती न परतल्याने तिच्या पालकांनी वर्गमित्राला फोन केला तेव्हा त्याने मुलगी शाळेतच आली नसल्याचं सांगितलं. नंतर पालकांनी अंधेरी पोलिसामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला

शुक्रवार (26 ऑगस्ट)च्या दुपारी पोलिसांना परेरा नगर येथील झुडपात ट्रॅव्हल बॅग आढळली. मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून बॅगेत भरण्यात आला होता. पोलिसांनी सध्या मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. तसेच खूनाचा अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर माजी शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी शोक आणि संताप व्यक्त करत मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत त्यांनी तातडीने तपासाची आणि आरोपींना कडक शासनाची मागणी केली आहे.

 

संबंधित पोस्ट

प्रसिद्ध गायक पंजाब येथील सिद्धू मूसे वाला हत्याकांड मास्टरमाइंड सचिन बिश्नोई याला में, अजरबैजान येथून अटक..

vishwatmaklokswamivarta

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई, 16.36 किलो सोने केले जप्त, दोघांना अटक…

vishwatmaklokswamivarta

देशात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

vishwatmaklokswamivarta

युगांडाच्या एका महिलेला 49 कॅप्सूलमध्ये 535 ग्रॅम हेरॉईन आणि 15 कॅप्सूलमध्ये 175 ग्रॅम अंमली पदार्थांसह मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta