vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

गौतम अदानी जागातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट यांना टाकले मागे; ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स अहवाल प्रसिद्ध

गौतम अदानी जागातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट यांना टाकले मागे; ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स अहवाल प्रसिद्ध…

 

व्यावसायिक प्रतिनिधीअदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अडानी हे आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकत अदानी यांनी ही कामगिरी केली आहे. ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) ने नुकताच याबाबत एक अहवाल जाहीर केला.

 

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अडानी हे आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault ) यांना मागे टाकत अदानी यांनी ही कामगिरी केली आहे. ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) ने नुकताच याबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार जगभरातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली जाते. यात भारतीयांमध्ये अदानींचा क्रमाक पहिला आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 137 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. 60 वर्षीय यशस्वी उद्योजकांच्या यादीत आता केवळ एलन मस्क आणि जेफ बोझेस हे दोघेच अदानी यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहेत.

 

टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांची एकूण संपत्ती 251 बिलियन डॉलर आहे तर अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची संपत्ती 153 बिलियन डॉलर आहे. त्यामुळे भविष्यात अदानी यांची संपत्ती आणखी वाढली तर अदानी हे सुद्धा जगातील श्रीमंत व्यक्तीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर दिसू शकतात

 

 

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी यांनी LVMH मोएट हेनेसी लुई वुइटन चे सह संस्थापक, फ्रेश बिजनेस मॅग्नेट बर्नार्ट अरनॉल्ट यांना पाठिमागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती ठरण्याचा बहुमान पटकावला. ब्लूमर्गच्या एका अहवालानुसार, आजवरच्या इतिहासात प्रथमच एखाद्या एशियाई व्यक्तीने जगातील पहिल्या तिन श्रीमंत व्यक्तीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. भारतीय यशस्वी उद्योजक मुकेश अंबानी आणि चीनस्थित अलीबाब समूहाचे जॅक मा तसेच इतर अशियाई यांना मात्र श्रीमंत व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवता आले नाही.

संबंधित पोस्ट

अंबानींची मोठी घोषणा; Jio आणि रिलायन्स रिटेलसाठी आयपीओची तयारी…

vishwatmaklokswamivarta

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची    – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरूऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन..

मिरज येथे 25 सप्टेंबरला रोजगार मेळावा…

vishwatmaklokswamivarta

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा १० वरुन १५ लाख रुपये…