vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विमा कंपनीची दीड कोटींची फसवणूक; मुंबईत गुन्हा दाखल, देशभरात १,१२९ विमादावे संशयास्पदऑनलाईन वाहन विमा सुविधा देणाऱ्या देशातील प्रसिद्ध कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काही विमा एजंटविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल

विमा कंपनीची दीड कोटींची फसवणूक; मुंबईत गुन्हा दाखल, देशभरात १,१२९ विमादावे संशयास्पदऑनलाईन वाहन विमा सुविधा देणाऱ्या देशातील प्रसिद्ध कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काही विमा एजंटविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

 

मुंबई प्रतिनिधी: ऑनलाईन वाहन विमा सुविधा देणाऱ्या देशातील प्रसिद्ध कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली काही विमा एजंटविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

विमा कंपनीचे सहाय्यक उपाध्यक्ष पद्माकर त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार विमा कंपनी एका संकेतस्थळाच्या मदतीने ऑनलाईन विमा देते. त्यासाठी ग्राहकांना त्यांच्या गाडीची व इतर माहिती द्यावी लागते. २०२० व २०२१ मध्ये देण्यात आलेल्या विम्यांचे कंपनीने लेखापरीक्षण केले असता अनेक विम्यांसाठी मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, आयपी अ‍ॅड्रेस सारखेच असल्याचे निष्पन्न झाले. देशभरातील सुमारे १,१२९ विमादावे संशयास्पद आढळले. आरोपींनी आणखीही काही कंपन्यांची अशाच पध्दतीने फसवणूक केली असल्याचा संशय आहे.

संबंधित पोस्ट

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी एनएसजी करणार सायक्लोथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई मध्ये पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात भिडणार शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे गट; 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे व अवकाळी पावसाची शक्यता; मच्छिमारांना सतर्कतेचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका लोककल्याण मेळावा अंतर्गत फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न..

प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Reffill) मोफत योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी बँक खाती आधार संलग्न करणे व गॅस एजन्सी डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक