vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान

 

दिल्ली प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडते आहे. पाठिमागील 24 वर्षांमध्ये कँग्रेस पक्ष अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत.

 

 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज निवडणूक (Congress Presidential Election) पार पडते आहे. पाठिमागील 24 वर्षांमध्ये कँग्रेस पक्ष ( Congress Party) अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नव्हती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे जवळपास दोन-अडीच दशकांनंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष पदावर निवडला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी गुप्त मतपत्रिकेद्वारे इलेक्टोरल कॉलेजमधून 9,000 पेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी मतदान करतील. हे प्रतिनिधी दर पाच वर्षांनी संस्थेतून निवडले जातात.

 

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. भारत जोडो यात्रेसाठी कर्नाटकमध्ये एक विशेष बूथ तयार करण्यात आला आहे. ज्यात माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल. खरगे आणि थरूर हे दोन दावेदार कर्नाटक आणि केरळ या त्यांच्याशी संबंधित राज्यांमध्ये मतदान करणार आहेत

 

काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, सर्व राज्यांतील प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रांवर उपलब्ध मतपत्रिकांमध्ये त्यांना हव्या त्या उमेदवाराला पाठींबा देणाऱ्या उमेदवाराला ‘टिक’ चिन्ह देतील.मतदान सुरळीत मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले

 

मतदान संपल्यानंतर, मतदानाच्या कुलीपबंद (सीलबंद) पेट्या दिल्लीला मंगळवारी

नेल्या जातील. मतमोजणीसाठी उघडण्यापूर्वी या पेट्या दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवले जातील, असेही मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.

बुधवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व मतपत्रिका एकत्र केल्या जातील. ज्याला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील तो काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडला जाणार आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात पोलिसांसाठी घरे उभारणार,मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आश्वासन

बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच मिळाली सत्ता महापालिका निवडणुकीत ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत : महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चार जागा : काँग्रेसला १०

vishwatmaklokswamivarta

मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी व वाटपासाठी विशेष कक्ष स्थापन…

vishwatmaklokswamivarta

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ उभारावे-उपमुख्यमंत्री…

vishwatmaklokswamivarta

मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षण निर्णय,

vishwatmaklokswamivarta

विधानसभा कामकाज -:वाळू धोरणामध्‍ये सुलभता येणार- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील