vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी पार्टीचे नेते अजित पवार ईडीच्या रडारावर? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीची शक्यता…

 राष्ट्रवादी पार्टीचे नेते अजित पवार ईडीच्या रडारावर? राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीची शक्यता…

 

राज्य सहकारी कथित बॅंक घोटाळा प्रकरणी ‘इओडब्ल्यू’ने फेरतपास सुरू केली आहे. याबाबत चर्चा सुरू आहे लवकरच याच्याशी संबंधित  असणाऱ्या अधिकारी आणि नेतेमंडळीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

 

राज्यातील नेत्यांची होणारी ईडीची चौकशी (ED Enquiry) काही नवीन नाही. अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरु आहे तर काहींना तर प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. तर आता ईडी कारवाईसाठी पुढील नंबर विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा लागतो की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा फेरतपासणी केल्या जाणार आहे. ‘इओडब्ल्यू’ने आपल्या भूमिकेत बदल करून प्रोटेस्ट याचिकांमधील मुद्दे व ईडीने मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन फौजदारी दंड संहितेच्या कलम 173 अन्वये फेरतपास सुरू केला असल्याची माहिती शनिवारी दिली आहे. म्हणजेच आता या घोटाळ्याची पुन्हा एकदा नव्याने चौकशी केली जाणार असेल तर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

 

इओडब्ल्यू’ने (EOW) आता आपल्या भूमिकेत बदल करून प्रोटेस्ट याचिकांमधील मुद्दे व ईडीने मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन फौजदारी दंड संहितेच्या कलम 173 अन्वये फेरतपास सुरू केला असल्याची माहिती शनिवारी लेखी म्हणण्याद्वारे दिली. या प्रकरणात एकूण 76 जणांची चौकशी होणार असुन यांत सर्वात मोठं नाव विरोधीपक्ष नेते अजित पवारांचं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात ही फाईल बंद झाल्यानंतर अनेक जनहुत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या जनहित याचिकांचं उत्तर म्हणूनचं आता पुन्हा एकदा या कथित प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे

 

संबंधित पोस्ट

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पार्किंगची व्यवस्था चोख अशाप्रकारे आहे बघा..

vishwatmaklokswamivarta

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा दुर्घटना: अमरावतीत समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे *शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta