vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मुंबईमधून भाजपा खासदार केसरी देवी पटेल यांना जीवे मारण्याची धमकी; 50 लाखांची खंडणीही मागितली

मुंबईमधून BJP खासदार केसरी देवी पटेल यांना जीवे मारण्याची धमकी; 50 लाखांची खंडणीही मागितली…

 

उत्तर प्रदेश प्रतिनिधी

कॉलरने त्यानंतरही अनेकवेळा कॉल केले आणि वारंवार धमक्या दिल्या तसेच खंडणीची मागणी केली. यावेळी खासदारांचे कॉल रेकॉर्ड करण्यात आले. महिनाभरापूर्वी 50 लाख रुपयांची मागणी करण्याची धमकी देणारे पत्र आले होते

 

 

 

प्रयागराज उत्तर प्रदेश येथील फुलपूरच्या भाजप खासदार केशरी देवी पटेल यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यापूर्वी फोन आणि पत्राद्वारे त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. केशरी देवी पटेल यांनी आता कर्नलगंज पोलीस ठाण्यात अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतून या धमक्या आल्याचे प्राथमिक निरिक्षणातून समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की पोलिसांचे पथक आता धमक्यांमागील व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

एफआयआरनुसार, केशरी देवी पटेल यांच्या मोबाईलवर 1 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. त्यावेळी फोन रिसिव्ह होऊ शकला नाही. त्यानंतर तीन मिनिटांनी त्यांना त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला. फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता समोरच्या व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली. फोन करणाऱ्याने 50 लाख रुपये देण्यास सांगितले आणि पैसे न दिल्यास खासदार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

कॉलरने त्यानंतरही अनेकवेळा कॉल केले आणि वारंवार धमक्या दिल्या तसेच खंडणीची मागणी केली. यावेळी खासदारांचे कॉल रेकॉर्ड करण्यात आले. महिनाभरापूर्वी 50 लाख रुपयांची मागणी करण्याची धमकी देणारे पत्र आले होते, मात्र त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही, असेही खासदारांनी पोलिसांना सांगितले. कर्नलगंज पोलीस ठाण्याचे एसएचओ राम मोहन राय यांनी एफआयआरला दुजोरा देताना सांगितले की, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

संबंधित पोस्ट

मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पाथ्रीकर कॅम्पसला भेट..

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यास सहकार् करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन सेवेतून निलंबित करणार- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

उथळ पाण्यात कार्यरत ‘अंजदीप’ हे तिसरे पाणबुडीरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

रामनवमीसाठी अयोध्या सज्ज..

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट