vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडचा करणार सामना

भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत इंग्लंडचा करणार सामना…

क्रिकेट प्रतिनिधी

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

 

मेलबर्नमध्ये भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा 42 वा सामना खेळला गेला. सुपर-12 फेरीतील हा शेवटचा सामना होता. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकांत 115 धावांवर गारद झाला. या नंतर आता भारताचे लक्ष उपांत्य फेरीवर (Semi Final) असणार आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडसोबत (IND vs ENG) होणार आहे

 

भारतीय संघाचा पुढील सामना उपांत्य फेरीत इंग्लंडशी होणार आहे. तो जिंकून भारतीय संघाला पुढील रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान मिळवायचे आहे. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना, भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावून 46 धावा केल्यामुळे चांगली सुरुवात झाली. यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा (15) स्वस्तात निसटला. त्यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसोबत 48 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली, मात्र कोहली (26) विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला.

संबंधित पोस्ट

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामकाजाचासंबंधीची माहिती जाणून घेत आढावा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्सवात संपन्न…

vishwatmaklokswamivarta

जागतिक मृद दिन -विशेष लेख- चला माती परीक्षण करुया, आपली जमीन समृद्ध करुया!

vishwatmaklokswamivarta

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta