vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद:कर्नाटकच्या बसेसला काळे फासले, लिहिले ‘जय महाराष्ट्र मनसे चे आंदोलन.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद:कर्नाटकच्या बसेसला काळे फासले, लिहिले ‘जय महाराष्ट्र मनसे चे आंदोलन.

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा विवाद सुरू असतानाच आता मात्र याच्या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही उडी घेतलेली आहे सीमा विवाद याच्यावर लवकर निर्णय न झाल्यास आणि परिस्थिती  सुधारली नाही तर कर्नाटकच्या बसेस जिल्ह्यात धावू देणार नाही, असे मनसेचे म्हणणे आहे.

 

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद सातत्याने वाढत आहे. मंगळवारी कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात महाराष्ट्र नंबर प्लेट असलेली वाहने थांबवून त्यांना लक्ष्य करण्यात आले. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आता सिंधुदुर्गात मनसे कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून घडलेल्या गोष्टीचा निषेध केला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला. परिस्थिती सुधारली नाही तर कर्नाटकच्या बसेस जिल्ह्यात धावू देणार नाही, असे मनसेचे म्हणणे आहे. तसेच पुण्यातील मुंबई बंगलोर महामार्गावर कर्नाटकच्या दिशेने जाणारी बस रोखून मनसेने आंदोलन केले. कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आले.

संबंधित पोस्ट

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

आमदार रवी राणा हे शिवसेनेव र भारी पडले आहेत. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भातकुली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. राणा यांच्या पक्षाचे तब्बल नऊ उमेदवार निवडून आले

vishwatmaklokswamivarta

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाद्वारे समृद्ध राष्ट्राची निर्मिती- राज्यपाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ७५ फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण चित्ररथ व इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण

युवकांना रोजगाराची संधी वैजापूर येथे रोजगार मेळाव्याचे आज (दि.24) आयोजन

करोना,ची तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्‍यक असलेले नियोजन करण्यात सोलापूर जिल्हा परिषद राज्यात सर्वांत पुढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी.