
आमदार रवी राणा हे शिवसेनेव र भारी पडले आहेत. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भातकुली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. राणा यांच्या पक्षाचे तब्बल नऊ उमेदवार निवडून आले आहेत.
अमरावती प्रतिनिधी: भातकुली नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यामध्ये आमदार रवी राणा हे शिवसेनेव र भारी पडले आहेत. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भातकुली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे. राणा यांच्या पक्षाचे तब्बल नऊ उमेदवार निवडून आले आहेत.
भातकुली नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये थेट लढत होती. पण, शिवसेनेला कोणताही मोठा चेहरा नव्हता. त्यामुळे इथं शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले नाही, असं बोललं जात आहे. तसेच आमदार रवी राणा यांचं या क्षेत्रात आधीपासूनच प्रस्थ आहे. त्यांनी पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यासोबत प्रचार केला. त्याचे फळ देखील त्यांना मिळाले आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला एकूण ९ जागा मिळाल्याने या नगरपंचायतवर रवी राणा यांचे वर्चस्व कायम आहे. भाजपचे दोन, शिवसेनेचे तीन तर दोन अपक्ष उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.कोणत्या पक्षाला किती जागा? युवा स्वाभिमान : 9सेना : 3भाजप : 2अपक्ष : 2काँग्रेस : 1 भातकुलीत 87.08 टक्के मतदानदरम्यान, मंगळवारी (ता.18) प्रभाग सातसाठी मतदान शांततेत पार पडले. 395 पैकी 344 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 169 पुरुष व 175 महिलांचा समावेश आहे. त्याचे शेकडा प्रमाण 87.08 टक्के आहे.



