vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आशियातील दानशूर व्यक्तीच्या यादीत उद्योगपती गौतम अदानी यांना स्थान; दिले होते 60,000 कोटींची देणगी .

आशियातील दानशूर व्यक्तीच्या यादीत उद्योगपती गौतम अदानी यांना स्थान; दिले होते 60,000 कोटींची देणगी..

 

विशेष प्रतिनिधी

अदानी फाउंडेशनची स्थापना 1996 मध्ये झाली. दरवर्षी हे फाउंडेशन भारतातील 37 लाख लोकांना मदत करते. दुसरीकडे अब्जाधीश शिव नाडर यांनी शिव नादर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एका दशकात धर्मादाय कार्यात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

 

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले गौतम अदानी (Gautam Adani) आता परोपकाराच्या बाबतीत पुढे आहेत. गौतम अदानी हे आशियातील सर्वात मोठे दानवीर ठरले आहेत. फोर्ब्स आशियातील परोपकारी व्यक्तींची यादी (Asia Philanthropy List) मंगळवारी प्रसिद्ध झाली. या यादीच्या 16 व्या आवृत्तीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशिवाय शिव नाडर आणि अशोक सूता यांचीही नावे आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार हे तिघे आशियातील सर्वात मोठे दानशूर आहेत.

त्याचबरोबर मलेशियन-भारतीय उद्योगपती ब्रह्मल वासुदेवन आणि त्यांची पत्नी शांती कंडिया यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या यादीमध्ये कोणत्याही रँकिंगशिवाय आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आघाडीच्या दानशूर व्यक्तींचा समावेश आहे. अदानी यांनी या वर्षी जूनमध्ये त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 60,000 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले होते.

ही रक्कम शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासावर खर्च करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी (23 जून 2023) अदानी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. या ट्विटमध्ये ते शाळकरी मुलांसोबत दिसले होते. ट्वीटसोबत त्यांनी लिहिले होते, ‘माझ्या वडिलांच्या 100 व्या जयंती आणि माझ्या 60 व्या वाढदिवसानिमित्त, अदानी कुटुंबाने देशभरातील आरोग्य सेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी 60,000 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले आहे.’

 

याच कारणामुळे त्यांचा आशियातील सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अदानी फाउंडेशनची स्थापना 1996 मध्ये झाली. दरवर्षी हे फाउंडेशन भारतातील 37 लाख लोकांना मदत करते. दुसरीकडे अब्जाधीश शिव नाडर यांनी शिव नादर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एका दशकात धर्मादाय कार्यात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यावर्षी त्यांनी फाऊंडेशनला 11,600 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या फाउंडेशनची स्थापना 1994 मध्ये झाली

 

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25-सहभागी होणेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

डोंबिवलीची घटना धक्कादायक, राज्यात भयाचं वातावरण, देवेंद्र फडणवीस यांची टीका.

vishwatmaklokswamivarta

शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी अनिश्चित?

मीरा-भाईंदर येथील मेट्रो -9 उडाणपुल क्र.2 चेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पीएमएलए कायद्यातील तरतुदी कायम राहणार; सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब

सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात बहुमान!