vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून मुख्यमंत्र्याची राजीनामाची मागणी

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या .राजीनाम्याची मागणी.

नागपूर प्रतिनिधी

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला.राजीनाम्याची मागणी

 

महाराष्ट्र सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधिमंडळ संकुलात निदर्शने करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकनाथ शिंदे यांनी यांनी मागील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये मंत्री असताना झोपडपट्टीवासीयांसाठी असलेली जमीन खाजगी व्यक्तींना देण्याबाबत घेतलेला निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

 

एमव्हीए सरकारचे नगरविकास मंत्री असताना शिंदे यांनी झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी गृहनिर्माण योजनेसाठी संपादित केलेली जमीन 16 खाजगी व्यक्तींना देण्याचे निर्देश एनआयटीला दिले होते, अशी माहिती हायकोर्टाच्या खंडपीठाला 14 डिसेंबर रोजी अॅमिकस क्युरी वकील आनंद परचुरे यांनी दिली होती

राज्य विधिमंडळाच्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी, विधान भवनातील काँग्रेस कार्यालयात एमव्हीए नेत्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे आणि अन्य नेत्यांनी निदर्शने केली. शिंदे सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी नेत्यांनी घोषणाबाजी केली आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

संबंधित पोस्ट

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !* – हिंदु जनजागृती समिती

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा – प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta