vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे

मंत्रालय प्रतिनिधी

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या मागणी नंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले.

विधीमंडळ सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नागपूरमधील एनआयटी भूखंड प्रकरणी बॅकफूट गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. विधिमंडळातील गदारोळामुळे कामकाज काही वेळा स्थगित करावे लागले होते. दरम्यान विधान परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांनी रान उठवले होते. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाजही काही काळ स्थगित करण्यात आले होते.

विधान परिषदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यात त्यांनी म्हटले की, खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. मात्र पोलिसांचा संबंधित पीडितेवर दबाव आहे. पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे. मात्र, या दबावामुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. या मी प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच या पीडित तरुणीच्या जीविताला धोका असल्याचे कायंदे यांनी म्हटले. एसआयटी स्थापन करून राहुल शेवाळे यांची चौकशी करा, अशी जोरदार मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी केली.

संबंधित पोस्ट

चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मोबाईल चोरीला

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका होणार आणि महाविकास आघाडी जिंकणार; संजय राऊत… खासदार

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं अपात्र उमेदवारांच्या यादीत; सत्तारांनी आरोप फेटाळले….

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी; रोहित पवार यांचे कौतुकोद्गार

राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमागे घाणेरडे राजकारण… – संजय राऊत यांची प्रतिक्रिया