vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

रशिया युक्रेन युद्ध : क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनेच 600 हून अधिक सैनिक ठार, रशियाचा दावा

रशिया युक्रेन युद्ध : क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनेच 600 हून अधिक सैनिक ठार, रशियाचा दावा…

 

रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरुच आहे. दिवसेंदीवस हे युद्ध दोन्ही बाजूंकडून अधिक जीवित आणि वित्त हानीला निमंत्रण देत आहे. युक्रेनचे सुमारे 600 सैनिक प्रतिकारात्मक केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरुच आहे. दिवसेंदीवस हे युद्ध दोन्ही बाजूंकडून अधिक जीवित आणि वित्त हानीला निमंत्रण देत आहे. युक्रेनचे सुमारे 600 सैनिक प्रतिकारात्मक केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे. आमच्या सहकारी इंग्रजी संकेतस्थळाने वृत्तसंस्थेच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, युक्रेनियनच्या ताब्यात असलेल्या डॉनबासमधील क्रॅमतोर्स्क  शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात कीवच्या 600 हून अधिक सैनिक ठार झाले, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने  दावा केला आहे.

नवीन वर्षाच्या रात्री डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक (डीपीआर) मधील मेकेयेव्का शहरात रशियन सैनिकांना राहणाऱ्या तात्पुरत्या गृहनिर्माण क्षेत्रावर युक्रेनने केलेल्या “गुन्हेगारी हल्ल्याला” प्रत्युत्तर म्हणून रविवारी करण्यात आलेला बॉम्बस्फोट हा “सूड घेण्याची कारवाई” होती, असे एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे.

युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात रशियाने म्हटले आहे की, युक्रेनेने केलेल्या ‘गुन्हेगारी हल्ल्या’चा रशियाने बदला घेतला. रशियाने रविवारी केलेल्या ‘प्रतिकात्मक हल्ल्यात’ ही कारवाई करण्यात आली. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा केवळ प्रतिकात्मक होता. त्यात केवळ सूड घेण्याची भावना होती, अशी प्रतिक्रिया रशियन मंत्रालयाने दिली. तसेच, रशियाने केलेला हल्ला हा युक्रेनने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या इमारतींवर करण्यात आल्याचेही रशियाने म्हटले

पाठिमागील 24 तासापासून रशियन सैन्य रशियन सैनिक असलेल्या ठिकाणांचा अचूक शोध घेऊन निशाणा लावत आहे. ज्यामुळे रशियन सैन्याचा पर्दाफाश होतो आहे. आमच्याकडील माहितीनुसार असे दिसून आले की शहरातील वसतिगृह क्रमांक 28 मध्ये 700 पेक्षा जास्त कीव सैनिक राहत होते, 600 हून अधिक वसतिगृह क्रमांक 47 मध्ये राहत होते, असेही रशियन मंत्रालयाने म्हटले आहे.

रशियन मंत्रालयाने पुणे म्हटले आहे की, 1 जानेवारी रोजी, सकाळी 0:01 वाजता, युक्रेनियन सैन्याने मेकेयेव्का शहरातील रशियन सैन्य असलेल्या तात्पुरत्या गृहनिर्माण क्षेत्राला लक्ष्य केले. यूएसने पुरवलेल्या HIMARS मल्टिपल रॉकेट लाँचरमधून इमारतीवर सहा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यापैकी दोन रशियन हवाई संरक्षणाद्वारे रोखले गेले, परंतु चौघांनी ते पार केले, ज्यामुळे सुविधेचे मोठे नुकसान झाले.

संबंधित पोस्ट

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन; ल्यूसिल रँडन यांचा मृत्यू, 118 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

vishwatmaklokswamivarta

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

vishwatmaklokswamivarta

बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक – अलियाक्सांड्र मात्सुकोऊ

युनायटेड स्टेट च्या सॅनफोर्ड फ्लोरिडा येथील कार्यक्रमात 10 जणांवर गोळीबार, 16 वर्षाचा संशयित पोलिसांच्या ताब्यात..

vishwatmaklokswamivarta

तालिबान संस्थापकांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरादर याची अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदावर निवड होण्याची शक्‍यता.

हे स्फोट केवळ दहशतवादी कृत्य नसून युद्धाची घोषणा म्हणून पाहिले पाहिजे, हिजबुल्ला प्रमुख नसराल्लाहची इस्रायलला धमकी,

vishwatmaklokswamivarta