vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमरावतीचा निकाल फिरवण्यासाठी 50 कोटी देण्याची तयारी, नाना पटोले यांचा गौप्यस्फोट….

अमरावतीचा निकाल फिरवण्यासाठी 50 कोटी देण्याची तयारी, नाना पटोले यांचा गौप्यस्फोट….

 

अमरावती प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरषदेच्या अमरावती मंतदारसंघात निकाल फिरविण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये देण्याची तयारी सुरु होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरषदेच्या अमरावती मंतदारसंघात  निकाल फिरविण्यासाठी तब्बल 50 लाख रुपये देण्याची तयारी सुरु होती, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, आपल्याला ही माहिती मिळताच आपण थेट कमिशनरना कॉल करुन माहिती दिली. तसेच, असे काही घडल्यास आपली नोकरी घालवली जाईल, असा इशाराही देण्यात आल्याचा दावा पटोले यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाना पटोले यांनी दावा केला की, अमरावतीचा निकाल फिरविण्यासाठी अशी काही तयारी असल्याची माहिती देण्यासाठी आपल्याला आयबीतील एका मित्राचा फोन आला होता. या मतदारसंघात लिगाडे जिंकले होते. परंतू, त्यांना तो निकाल जाहीरकरता येत नव्हता. मी लिगाडे यांना विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच बाहेर पडायला सांगितले होते. काही ठिकाणी दबाव टाकावा लागतो, असेही पटोले म्हणाले.

वाचकांच्या माहितीसाठी असे की, विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते मिळवली आहेत. दरम्यान, पटोले यांनी पुढे सांगितले की, आयबीतील मित्राचा फोन आल्यानंतर आपल्याला रात्रभर झोप आली नव्हती. काय करावे या विचाराने मी अस्वस्थ होतो. मात्र, जो राग होता तो निघून गेला आता आनंद असल्याची भावनाही पटोले यांनी व्यक्त केली

अमरावती येथून धीरज लिंगाडे यांचा आश्चर्यकारक विजय झाला. तर भाजपच्या रणजित पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजपसाठी त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

संबंधित पोस्ट

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सोने आणि चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, उच्चांकावरुन सोनं 2600 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरात घसरण

vishwatmaklokswamivarta

सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या-अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

इएमआय महागणार : आरबीआय कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ..

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या हंगामात Ola इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कंपनीने या मॉडेलवर 10 हजार रुपयांची कपात