vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा…

देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा…

 

मुंबई प्रतिनिधी

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत बाबुलनाथ मंदिर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर कोकणात कुणकेश्वर येथील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा केली गेली.

माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येणारी शिवरात्री ‘महाशिवरात्री’ म्हणून साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ‘शिवरात्री’ म्हणतात. दरवर्षी सुमारे १२ शिवरात्री येतात, या बारा शिवरात्रींमध्ये येणारी महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान शंकराने या दिवशी तिला पत्नी म्हणून स्वीकारले, असे सांगितले जाते. 

 

संबंधित पोस्ट

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्रासह देशात ‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात ट्रकचालकांचे आंदोलन; वाहतूकदारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केले आवाहन.

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

vishwatmaklokswamivarta

भारत विरूद्ध न्यूझिलंड सेमी फायनलचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला.. मुंबई पोलिसांना एक्सच्या माध्यमातून धमकीचा , स्टेडियमवर चौख पोलीस बंदोबस्त

vishwatmaklokswamivarta

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी; मुक्काम आर्थर रोड जेल….

vishwatmaklokswamivarta

सांगली पाटबंधारे विभागात पूर ‍नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

vishwatmaklokswamivarta