vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संजयसिंह ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रवक्त्यापदी नियुक्ती.

संजयसिंह ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रवक्त्यापदी नियुक्ती  –

मुंबई प्रतिनिधी

–भारतीय जनता पक्षाने तरुण आणि उत्साही आणि जवळपास ३ दशकांपासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावत असलेल्या संजय चंद्रशेखर सिंह ठाकूर यांना पक्षात महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदाची नवी जबाबदारी दिली आहे.यापूर्वी संजय सिंह ठाकूर हे मुंबई भाजपचे प्रवक्ते होते।।

–संजय सिंह ठाकूर यांचे भाजपचे धोरण आणि तत्वे युवा पिढीपर्यंत नेण्यात मोठे योगदान आहे.मुंबई प्रदेश चे प्रवक्ते असताना संजय ठाकूर यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि विविध माध्यमांच्या माध्यमातून भाजप पक्षाची विचारधारा अतिशय अचूक पद्धतीने ठेवण्याचे काम केले.संजय सिंह धडाकेबाज वक्ते आणि संपूर्ण संशोधन करून पक्षाची लाईन प्रसारमाध्यमांमध्ये ठेवणारे आहेत।।ठाकूर हे रस्त्यावरचे आंदोलक म्हणूनही ओळखले जातात.

गेली 3 दशके संजय ठाकूर यांनी अनेक सामाजिक व्यासपीठावर आणि राजकीय स्तरावर मुंबई आणि महाराष्ट्रात आपली बाजू मजबूत करण्याचे मोठे काम केले आहे.त्यांनी कधीही स्वतः पदाची लालसा न ठेवता पक्षाचे संघटन मजबूत करणारे व्यक्तिमत्व आहे।

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र देऊन संजयसिंह ठाकूर यांच्यावर ही विशेष जबाबदारी सोपवली आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता-केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

vishwatmaklokswamivarta

जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग  केल्याप्रकरणी  पोलिसांनी 29 वर्षीय डान्स कोरिओग्राफरला अटक 

एसटीच्या भाईंदर -पश्चिम येथील जागेचा महापालिकेच्या माध्यमातून विकास करणार -मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta