vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार गो बॅक अशा घोषणा देऊन अहमदनगर पारनेरच्या दौऱ्याला स्थानिक संघटनांचा विरोध…

राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार गो बॅक अशा घोषणा देऊन अहमदनगर पारनेरच्या दौऱ्याला स्थानिक संघटनांचा विरोध…

नगर प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पारनेरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, ‘शरद पवार गो बॅक’ अशी घोषणा देत स्थानिक संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार गो बॅक म्हणत या दौऱ्यांला विरोध केला जात आहे.

शरद पवार यांच्या या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला होता. समितीकडून कारखान्याच्या विक्रीत पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता. कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर रात्री जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार-गो बॅक’ असे लिहून आपली नाराजी कारखाना बचाव समितीने व्यक्त केली आहे. या आंदोलनाला भुमिपूत्र शेतकरी संघटना, भीम आर्मी , अन्याय निर्मुलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी देखील पाठींबा दिला आहे.मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कारखाना बचाव समितीने केली आहे.

 

संबंधित पोस्ट

चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता; बुलढाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांसाठी ७४ कोटी ४५ लाख मदतीच्या निधीस मान्यता- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

‘मोदी क्वेश्चन्स २००२‘ हा माहितीपट प्रसारित करणाऱया ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन वर(बीबीसी) भारतात संपूर्ण बंदी घालण्याची मागणी… 

vishwatmaklokswamivarta

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक लाभ देण्यात आला  – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे