
देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती शुभेच्छा,भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली प्रतिनिधी : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, ‘आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती साजरी करत आहोत. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देतं.’
मोदी म्हणाले, ‘जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आलं, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत वाहून नेला. याच प्रेरणेतून भाजपनंही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढंही सुरू ठेवणार आहे. हनुमानजींच्या सामर्थ्याप्रमाणंच आज भारताला आपल्या सामर्थ्याची जाणीव होत आहे.’
हनुमानजींकडून प्रेरणा मिळते’भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी भाजपला (BJP) हनुमानापासून प्रेरणा मिळते. जर आपण भगवान हनुमानाच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकली, तर त्यांच्याकडं “Can Do” वृत्ती होती, त्यामुळं त्यांना सर्व प्रकारचं यश मिळण्यास मदत झाली. आमचा पक्ष भारत माता, संविधान आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी पुढं म्हणाले, ‘आज भारत बजरंग बली सारख्या महासत्तेची जाणीव करून देत आहे. सागरासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मजबूत झाला आहे. आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते हनुमानजींची मूल्ये आणि शिकवणीतून सतत प्रेरणा घेत आहेत.’



