vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

म्यानमारच्या लष्कराचा बंडखोरांच्या भागात हवाई हल्ला, 100 हून अधिक ठार

म्यानमारच्या लष्कराचा बंडखोरांच्या भागात हवाई हल्ला, 100 हून अधिक ठार

 

विदेश प्रतिनिधी

एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 8 वाजता एका लढाऊ विमानाने सुमारे 150 लोकांच्या जमावावर बॉम्ब टाकले. मृतांमध्ये महिला आणि 20 ते 30 मुलांचा समावेश होता

म्यानमार लष्कराने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक मुले आणि पत्रकारांसह किमान 100 लोक मारले गेले आहेत. म्यानमारच्या सत्ताधारी जंटाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे,  लष्कराने बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पाजीगी भागात हा हल्ला केला. हा भाग सागेंग प्रांतात आहे. हल्ल्यावेळी काही नागरिक एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी एकत्र आले होते. म्यानमारच्या तख्तापालटानंतर हा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर केलेला मोठा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनूसार गावात एक लष्कराचे जेट विमान आले आणि त्याने गावावर बॉम्ब डागले तसेच गोळीबारही केला. स्वताच्या देशातील लोकांवर असे हल्ले केल्याच्या विरोधात जगभरातून म्यानमारमधील सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 8 वाजता एका लढाऊ विमानाने सुमारे 150 लोकांच्या जमावावर बॉम्ब टाकले. मृतांमध्ये महिला आणि 20 ते 30 मुलांचा समावेश होता, असे ते म्हणाले, मारले गेलेल्यांमध्ये स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या सरकारविरोधी सशस्त्र गट आणि इतर विरोधी संघटनांच्या नेत्यांचाही समावेश होता.

एका माहितीनुसार म्यानमार आपल्याच नागरिकांना ठार मारण्यासाठी वेगाने शस्त्रसाठा वाढवत आहे. निर्बंधांमुळे म्यानमार इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे तो स्वतःची शस्त्रे बनवत आहे. भारत, अमेरिका व जपानसह 13 देशांतील कंपन्या याकामी म्यानमारला मदत करत आहेत. म्यानमार हल्ल्यांसाठी चिनी व रशियन बनावटीची शस्त्रे वापरत असल्याचा दावा केला आहे.

 

संबंधित पोस्ट

नेपाळ मधील दुर्दैवी घटना नेपाळाच्या ‘तारा एअर’ कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची नेपाळच्य गृह विभागाचे प्रवक्ते पहाड दिनरमनी पोखरेल यांनी व्यक्त केली भीती…

द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केले भाषण

vishwatmaklokswamivarta

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पिझ्झा डिलिव्हरी बॉयने जळत्या घरातून 5 जणांना वाचवले; पहा व्हिडीओ

अमेरिकेत चाललंय काय? चर्चमध्ये पुन्हा भीषण गोळीबार; एक ठार, दोन जखमी

इजिप्तमधील शर्म अल शेख येथे आयोजित प्रतिष्ठित स्पर्धेच्या 52 व्या आवृत्तीत मिस इंटरकॉन्टिनेंटल 2024 द्वितीय उपविजेता जिंकून एलिसा मेरी या लगुनामध्ये जन्मलेल्या सौंदर्याने इतिहास रचला…

vishwatmaklokswamivarta