vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक..

 

राज्य प्रतिनिधी -भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १० ते १२ जून २०२५ दरम्यान स्वीडनमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम परिषद : निवडणूक प्रामाणिकतेवर आधारित परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral Integrity) दरम्यान विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था प्रमुखांशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकांमध्ये चर्चा केली..

या बैठका भारताच्या निवडणूक व्यवस्थापन व लोकशाही सहकार्य या क्षेत्रातील दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अनेक देशांच्या निवडणूक प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध निवडणूक अनुभव, नवोन्मेष आणि सहकार्यावर चर्चा केली.याच सत्रात, संध्याकाळी त्यांनी या परिषदेमध्ये उद्घाटनपर भाषण देऊन संमेलनाचे औपचारिक उद्घाटन केले.द्विपक्षीय बैठकीत सहभागी अधिकारी व संस्था :

१. मॅक्सिको –मारिसा अर्लीन काब्राल पोरचास (आंतरराष्ट्रीय व्यवहार समन्वयक) व नॉर्मा इरेने डेला क्रूझ (निवडणूक सल्लागार), नॅशनल इलेक्ट्रोरल इन्स्टिट्यूट२. इंडोनेशिया – मोचम्मद अफिफुद्दीन, अध्यक्ष, जनरल इलेक्शन कमिशन३. मंगोलिया – पुरवी डेल्गर्नारन, अध्यक्ष, जनरल इलेक्शन कमिशन

४. दक्षिण आफ्रिका – मोसोथो सायमन मोएप्या, अध्यक्ष, इलेक्टोरल कमिशन५. स्वित्झर्लंड – हान्सपीटर व्हिस, धोरण सल्लागार, स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट अँड को-ऑपरेशन६. मोल्दोवा –एंजेलिका कारामान (अध्यक्ष) व पावेल पोस्टिका (उपाध्यक्ष), सेंट्रल इलेक्शन कमिशन७. लिथुआनिया – डेरियस गैझॉस्कास, प्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग, सेंट्रल इलेक्टोरल कमिशन

८. मॉरिशस – अब्दूल रहमान मोहम्मद इरफान, निवडणूक आयुक्त

९. युनायटेड किंगडम – श्री विजय रंगराजन, मुख्य कार्यकारी, इलेक्टोरल कमिशन

१०. जर्मनी – अ‍ॅना-करीना एल्बर्ट (प्रमुख) व क्लॉडिया इस्फॉर्ट (सहायक प्रमुख), फेडरल रिटर्निंग ऑफिसर११. युक्रेन – ओलेह डिडेंको (अध्यक्ष) व विताली प्लुकार (उपाध्यक्ष), सेंट्रल इलेक्शन कमिशन

१२. क्रोएशिया – द्राझेंको पांडेक, स्टेट इलेक्टोरल कमिशन या आंतरराष्ट्रीय संवादांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, समावेशकता आणि नवोन्मेषासाठी जागतिक स्तरावर सहयोगाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

000

 

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta

अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू)कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta