vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

उत्तर प्रदेश येथील मंदिरात नंदी दुध पीत असल्याचा दावा; ‘चमत्कार’ पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी…

उत्तर प्रदेश येथील मंदिरात नंदी दुध पीत असल्याचा दावा; ‘चमत्कार’ पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी…

उत्तर प्रदेश प्रतिनिधी

नंदीला दूध पाजण्याची लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. पिनाहाट परिसरात रविवारी सकाळी मंदिरात लोटा, वाटी आणि चमच्याने नंदीला दूध अर्पण भाविक जमले होते.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या युगात आजही देशात अनेक लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात. विविध चमत्काराबाबत अनेक अफवा रोज समोर येत असतात. आता उत्तर प्रदेशमध्ये अलीगढ येथील नंदीची मूर्ती दुध पीत असल्याची अफवा समोर आली आहे. यानंतर अफवेवर विश्वास ठेऊन लोकांनी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. नंदीला दूध पाजण्याची लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. 

पिनाहाट परिसरात रविवारी सकाळी मंदिरात लोटा, वाटी आणि चमच्याने नंदीला दूध अर्पण भाविक जमले होते. आजूबाजूच्या अनेक गावातील लोक या मंदिरात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मंदिरामध्ये लोक नंदीला दूध पाजत होते.

शास्त्रानुसार मूर्ती दूध, पाणी किंवा कोणतेही द्रव पिणे हा चमत्कार नाही. हे पृष्ठभागावरील तणाव आणि केपलरियन बलामुळे होते. मूर्तीला अनेक छिद्रे असतात व त्यातून द्रव पदार्थ आत पाझरतो. बहुतेक दूध खालून बाहेर पडत असले तरी मूर्ती दूध पीत असल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते.

संबंधित पोस्ट

निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी..

vishwatmaklokswamivarta

फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा जाहीर*पोलीस अधीक्षकांकडून अधिसुचना जारी

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सदस्य शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची #पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

हजारो भीमसैनिकांच्या संख्येने उपस्थितीत धम्म मेळावा उत्साहात संपन्न – आयोजक राजेंद्र कांबळे यांनी मानले सर्वांचे आभार

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta