
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका च्या सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा ‘खलिस्तान समर्थकांचा’ प्रयत्न; अमेरिकेचा ‘तीव्र निषेध’
विदेश प्रतिनिधी
युनायटेड स्टेट्स येथील खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावली. सॅन फ्रान्सिस्को येथील अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. कोणतेही मोठे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या नाहीत
युनायटेड स्टेट्स ) येथील खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावली. सॅन फ्रान्सिस्को येथील अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. कोणतेही मोठे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या नाहीत. स्थानिक, राज्य आणि फेडरल अधिकरणांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. ANI ने ह्या संदर्भात माहिती दिली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे 1 ते 2.30 च्या दरम्यान ही लाग लावण्यात आली आहे.



