vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..

विदेश प्रतिनिधी: सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्हज परिषदेदरम्यान सदिच्छा भेट घेतली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्रिएटिव्ह उद्योगांतर्गत येणाऱ्या गेमिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. गेमिंगबाबतची बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यातील गेमिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सौदीबरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत. गेमिंग आणि ई-स्पोर्ट संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करून या क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे चेअरमन प्रिन्स फैसल बिन बदर बिन सुलतान अल सऊद यांनी सौदीमध्ये ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची यावेळी माहिती दिली. सौदीच्या विकासात ई-स्पोर्ट आणि सॅव्ही गेम यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आशियाई देशांमध्ये गेमिंगचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात महाराष्ट्रासोबत काम करण्यास सौदी उत्सुक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले

00000000

संबंधित पोस्ट

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

vishwatmaklokswamivarta

बँकॉकला शक्तिशाली भूकंपाचा धक्का! इमारती कोसळल्या, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा घाबरून पळून गेले, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सागिंगजवळ…

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर  काय म्हणाला, मीही मेलो असतो तर..; भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया..

इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान ! 🇮🇳🇮🇱 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ इथं ब्रिक्स शिखर परिषदेत ‘पर्यावरण, COP30 आणि जागतिक आरोग्य’ या विषयावरील सत्राला संबोधित केलं. यातील महत्त्वाच्या मुद्दे..

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta