vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनासमयी ते 80 वर्षांचे होते.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनासमयी ते 80 वर्षांचे होते.

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी ज्यांची ओळख करून दिली जाते अशा ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. गुरुवारी, (3 ऑगस्ट 2023) पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनासमयी ते 80 वर्षांचे होते.

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले . मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.

संबंधित पोस्ट

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास विभाग राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण..

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग विभाग:यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील..

सिर्फ दिल, बिना बिल-डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा नवी मुंबईतील रुग्णालयांची केली पाहणी,मोफत आरोग्यसेवेचं केले प्रत्यक्ष निरीक्षण..

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश