vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

कौशल्य विकास विभाग राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण..

कौशल्य विकास विभाग राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण..

 

राज्य प्रतिनिधी राज्यातील १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना समाजसुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

राज्यात सध्या ४१९ शासकीय आणि ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यापैकी १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात येणार आहेत.

 

यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे नाव कै.विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड, औ.प्र.संस्था जामखेड जि.अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड जि. अहमदनगर, औ.प्र.संस्था मुंबई शहरचे नाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था येवला जि.नाशिकचे नाव महात्मा ज्योतिबा फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र. संस्था जव्हार जि.पालघरचे नाव भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था कोल्हापूरचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था अमरावतीचे नाव संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था सांगलीचे नाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांवचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था आर्वी जि.वर्धाचे नाव दत्तोपंतजी ठेंगडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था बेलापूर नवी मुंबईचे नाव दि.बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र. संस्था कुर्लाचे नाव महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.संस्था भूम जि.धाराशिवचे नाव आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औ.प्र.ठाणेचे नाव धर्मवीर आनंद दिघे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे होणार आहे.

संबंधित पोस्ट

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.२० रोजी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनजिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

श्री समर्थ सद्‌गुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त-कोप्रोली येथे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई अनुदानअनियमितता प्रकरणी चौकशी सुरू- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta