vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार,सिम्बॉयसिसच्या प्राध्यापकाकडून हिंदू देवतांचा अपमान ; ‘त्या’ वक्तव्यानंतर पोलिसांकडून अटक

:पुण्यातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रकरण :कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी हिंदू देवतांचा अवमान केल्याचा आरोप आहे सिम्बॉयसिसच्या प्राध्यापकाकडून हिंदू देवतांचा अपमान ; ‘त्या’ वक्तव्यानंतर पोलिसांकडून अटक

[ पुणे प्रतिनिधी: हिंदू देव-देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. प्रा अशोक ढोले असं त्याचे नाव असून डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा ढाला याला अटक करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केली होती. त्यानंतर अखेर आज डेक्कन पोलिसांनी कलम 295\ अ अंतर्गत कारवाई केली आहे.

 

पुण्यातील प्रतिष्ठित अशा सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. या कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले यांनी हिंदू देवतांचा अवमान केल्याचा आरोप आहे. नावेत बसून प्रवासाला निघालेले हिंदू दाम्पत्य संकटात सापडते त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणताही देव धावून येत नाही. या उलट मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या मदतीला त्यांचे देव धावून येतात आणि त्यांचा जीव वाचवतात, अशा आशयाचं विधान प्राध्यापक ढोले यांनी केले होते.

 

विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना त्यांनी हे विधान केले होते. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही. हिंदुत्ववादी संघटनांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर पुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक अशोक ढोले यांना सिम्बॉयसिसच्या व्यवस्थापनाकडून निलंबित करण्यात आलं आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

दरम्यान, प्राध्यापक ढाले यांचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तर, अशोक ढोले यांना अटक करण्याबाबतचा आरोप मूळ तक्रारदार सकल हिंदू सामाजिक संघटनेने केला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे राखीव

vishwatmaklokswamivarta

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

आज महाराष्ट्र बंद; जाणून घ्या कोणत्या सेवांवर होणार परिणाम

vishwatmaklokswamivarta

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न,मान्सूनपुर्व सर्व कामे संबधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

9 ऑगस्ट पासून सुरु होऊ शकते महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन; त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता