vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे,विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव विरवटकर सन्मानित…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे,विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव विरवटकर सन्मानित…

ठाणे, प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य शासनाच्या “स्व.शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ संपादक श्री.कैलास म्हापदी यांची तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर पत्रकार श्री. संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत आणि विभव विरवटकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि.20 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झालेल्या “राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण” सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव निलेश पानमंद, खजिनदार विभव विरवटकर, मनोज सिंग व सहकारी पदाधिकारी, पारितोषिक विजेते छायाचित्रकार तसेच नागरिक उपस्थित होते.

 

000000000000

संबंधित पोस्ट

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

मुंबईत धारावी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सूर्यकांत परशुराम भालेकर भावी नगरसेवकाच्या यादीत असलेली चर्चा विभागात सुरू

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

राज्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा संदेश; मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्ट..

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*  

रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज#लोकसभानिवडणूक२०२४#उत्सवनिवडणूकीचाअभिमानदेशाचा