vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील कुर्ला येथे ग्राउंड प्लस टू  च्या घराचे भिंत चाळीवर कोसळली, या दुर्घटनेमध्ये १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..

मुंबईतील कुर्ला येथे ग्राउंड प्लस टू  च्या घराचे भिंत चाळीवर कोसळली, या दुर्घटनेमध्ये १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील कुर्ला सुभाष नगर परिसरातील घटना ग्राउंड प्लस टू बांधकामाची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 वर्षाच्या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

कुर्ल्यातील सुभाष नगर येथील घटना आहे. या घटने नंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी परिसरातील स्थिती पाहण्यासाठी दाखल झाले. या घटनेमुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कुर्ल्यातील सुभाष नगर येथील ग्राऊंड प्लस टू इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळली. या घटनेत १८ वर्षीय तरुणीवर मोठी भिंत कोसळली.  वैष्णवी प्रजापती असे या तरुणीची नाव होते. वैष्णवी सकाळी घरात एकटी होती त्यामुळे या घटनेतील मोठी जीवीतहानी टळली. मोठीच्या मोठी भिंत वैष्णवीच्या घरात येवून पडली. या घटनेत ती संपुर्ण जखमी झाली.  स्थानिकांच्या मदतीने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीला भाभा रुग्णालयात दाखल केल्या नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटने नंतर मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी पाहणी केली. त्याच बरोबर भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुर्ला एल वार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी करतात परंतु पालिकेचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची सूत्रांची माहिती आहे

संबंधित पोस्ट

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं63व्या वर्षी निधन…

विधानपरिषद लक्षवेधी- :राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असूनही शाळा बंद नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांचे योग्य समायोजन होणार

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजरा

मुंबईत बीएसटी बसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर…

स्वयम् अभियान व डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचा प्लास्टिक ई वेस्ट कचरा उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण..

vishwatmaklokswamivarta