vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार गणेशोत्सव” सजावट देखावा स्पर्धेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे

 माझा गणेशोत्सव माझा मताधिकार गणेशोत्सव” सजावट देखावा स्पर्धेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे

 

रायगड, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने “माझा गणेशोत्सव माझा मताधिकार” या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करुन त्यातून मतदार जागृतीबाबत सामाजिक संदेश देता येतात.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. तरी जिल्हयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन मतदार जागृतीबाबतच्या सामाजिक संदेशाचा देखावा सजावटीतून सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले आहे.

 

या स्पर्धेत मंडळांनी देखावे व सजावटीद्वारे मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण इ. विषयावर प्रबोधन करावयाचे आहे. देखावे सजावटीसाठी काही ढोबळ विषय पुढीलप्रमाणे आहेत. 1. लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही! 2. मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून.. 3. आम्ही मतदान करणार, कारण.. 4. हक्क वंचितांचे, मार्ग मताधिकाराचा 5.शहरी मतदारांची अनास्था कारणे आणि उपाय. या विषयांपलीकडेही जाऊन आपणास देखाव्यांतून सामाजिक संदेश देता येतील. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे आवश्यक आहे.

 

पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नाव नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

 

प्रत्येक नागरिकाला विविध प्रकारच्या सार्वजनिक सुविधा प्राप्त होणे आणि त्या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे, आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू व तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरुपी विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच खऱ्या अर्थाने लोकांनी, लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.

 

स्पर्धेचा गूगल अर्ज आणि काही तांत्रिक नियमावली लवकरच पाठविण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे – प्रथम क्रमांक एक लाख रुपये, द्वितीय क्रमांक – एकावन्न हजार रुपये, तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये आणि उत्तेजनार्थ दहा हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे (वि.सू. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसाच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजक आणि परीक्षकांचा राहील.)

00000

सुधारित

 

 

कोकणातला गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती होण्यासाठी

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

-अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्र सिंगल

नवीमुंबई, दि. 5 :- कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहनांची वर्दळ नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले आहे.

गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रायगड पोलीस अधिक्षक (महामार्ग) तानाजी चिखले, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे, पुणे विभाग पोलीस अधिक्षक गजानन टोम्बे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. बी. पाटील, नवी मुंबई सहाय्यक पोलीस उपायुक्त सुनिल बोंडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सव काळात राज्याच्या विविध ठिकाणांहून चाकरमाने कोकणात आपल्या गावी मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक डॉ. सिंगल यांनी दिली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत. घाट क्षेत्रातील दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. महामार्ग क्र. 48 वर किरकोळ दुरुस्ती अंतर्गत खड्डे बुजविणे, बाजूपट्ट्या दुरुस्त करणे, लेन मार्किंग करणे, माहिती फलक स्वच्छ करणे इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. बोर घाटात अपघात कालीन परिस्थिती उद्भवल्यास एकूण 4 ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियोजन करण्या

[06/09, 9:19 am] Swamiji: वाहतुक नियंत्रण व नियोजन करण्यासाठी घाट निरिक्षक प्रतिसाद पथक 24 तास तैनात करण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या जनतेची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत 3 हजार 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघात टाळण्याकरिता चालक आणि वाहक यांची अल्कोहोल चाचणी करण्यात येणार आहे. सहा अपघात प्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पथक तैनात ठेवण्यात येणार आहेत. बसस्टँडवरील चोरी सारखे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी मंडळामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.

राष्ट्रीय महामार्गावर गणेश भक्तांच्या सेवा सुविधांसाठी दर 15 कि.मी. अंतरावर “सुविधाकेंद्र” उभारण्यात येणार असून, या सुविधा केंद्रात आरोग्य विषयक सुविधा, शौचालय, चहापान कक्ष, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहेत. तसेच वाहनांच्या दूरुस्तीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी अवधी असून या काळात सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या कामांची नियोजित ठिकाणी रंगित तालीम करावी. जेणे करुन उद्भवणाऱ्या अडचणींवर वेळे आधी मात करता येईल.

यावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील ब्लॅक स्पॉट, रस्ते दुरुस्ती तसेच इतर अडचणींबाबत चार्चाकरण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*******

संबंधित पोस्ट

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 महत्वाची भूमिका बजावेल— कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगरात मानव – बिबटे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दैनंदिन आढावा

vishwatmaklokswamivarta

मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड;मच्छिमार संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शहापूर व मुरबाड तालुका टँकरमुक्त करण्यासाठी ‘शिवजल सुराज्य अभियान’

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या,वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा  

vishwatmaklokswamivarta

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.