
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 महत्वाची भूमिका बजावेल— कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे
रायगड प्रतिनिधी: शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठ स्तरावर स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली असून, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सर्व अकृषि विद्यापीठांशी संलग्नित सर्व महाविद्यालयामधील पदवी अभ्यासक्रमांच्या तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना राज्यात राबविण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 मधील शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामाबाबत जागृती होण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे चे कुलगुरू प्रा.(डॉ.) कारभारी विश्वनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्कुल कनेक्ट” (NEP कनेक्ट) अभियान राबविण्यात आले असून या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 10 महाविद्यालयामध्ये दि. 15 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान “स्कुल कनेक्ट” (NEP कनेक्ट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अयोयोजित “स्कूल कनेक्ट” (NEP कनेक्ट) कार्यशाळेत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) कारभारी विश्वनाथ काळे यांनी प्राचार्य व शिक्षकांशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील विद्यार्थी केंद्रीत शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, इंडिअन नॉलेज सिस्टीम, अकॅडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलायीन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन केले.
या कार्यशाळे दरम्यान डॉ. अरविंद किवळेकर, कुलसचिव, डॉ. ए. पी. शेष, इंग्लिश विभाग प्रमुख व डॉ.एस.एल. नलबलवार, अधिष्ठाता- शैक्षणिक व संचालक, DBATU फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइझ यांनी प्राचार्य व शिक्षकांशी संवाद साधला.
या उपक्रमाच्या विद्यालय स्तरावर यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठातील प्रा. प्रशांत आगवणे, प्रा. रोशन बोंडे, प्रा. तेजस भैसे, प्रा. गणेश काळे, प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा. रविंद्र सोनावणे, प्रा. राजेश धनपलवार, प्रा. सुरज शेलार, डॉ. माधुरी भगत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील शैक्षणिक बदलांबाबत व त्याच्या सकारात्मक परिणामाबाबत माहिती दिली. या उपक्रमादरम्यान उष्मयान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नविन खंडारे यांनी उद्योजकता व स्टार्टअप या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. या कार्यशाळेत ७०२ विद्यार्थी व 88 प्राचार्य व शिक्षकांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी DBATU फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइझ, विद्यापीठ अधिकारी/कर्मचारी तसेच महाविद्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.
00000000



