vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्हयातील १४ तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर,सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणेसाठी अर्ज मागवले.

जिल्हयातील १४ तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर,सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणेसाठी अर्ज मागवले.

 

अलिबाग, प्रतिनिधी- जिल्हयामध्ये परीसरातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हयातील १४ तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना २०१७-१८ पासून राबवण्यात येत आहे. पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड, सुधागड पाली, कर्जत, अलिबाग या तालुक्यातून पुरेसा प्रतिसाद अद्याप पर्यंत न मिळाल्याने या योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत. या सहा तालुक्यातून प्राप्त अर्जातून प्रत्येकी एका लाभार्थ्याची जिल्हा निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल. सूचना व योजनेच्या अंमलबजावणी बाबत तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे रायगड-अलिबाग जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. आर. बी. काळे यांनी कळविले आहे.

 

या योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाने परिपरित केलेल्या अर्जाचा नमूना तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार यांच्याकडे उपलब्ध राहील. निवड केलेल्या लाभार्थीना हा प्रकल्प ३ वर्ष कार्यान्वित ठेवणे बंधनकारक राहील. निवड केलेल्या लाभार्थ्यांना ५ दिवसांचे कुक्कुट पालन विषयक प्रशिक्षण व खाजगी अंडी उबवणूक केंद्र, शासकीय अंडी उबवणूक केंद्र, लघु अंडी उबवणूक यंत्राचा वापर करीत असलेल्या प्रक्षेत्रावर भेटीचा समावेश आहे. लाभार्थी निवड ही जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णया प्रमाणे सात सदस्यांच्या गठीत समिती पुढे निवड केली जाणार आहे.

 

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी सूचना व योजनेच्या अंमलबजावणी बाबत तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

 

000

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायटीमार्फत-कंत्राटी पद्धतीने पदभरती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास-प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू पशुपालकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

1 जुलैपासून लागू होऊ शकतात नवीन कामगार कायदे; कामाचे तास, पगार, पीएफ, सुट्ट्या यामध्ये होणार मोठे बदल

एक रुपयात पिक विमा योजनेत,जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन.

पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना लाभासाठीअर्ज करण्याचे आवाहन

नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात कसा आहे सोने चांदी दर? जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांतील प्रति तोळा किंमत

vishwatmaklokswamivarta