vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

एक रुपयात पिक विमा योजनेत,जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन.

एक रुपयात पिक विमा योजनेत,जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन.

राज्य प्रतिनिधी,

राज्य शासनाने पिक विमा योजनेत बदल केले असून आता सर्वसामावेशक पिक विमा योजना म्हणून शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचा या योजनेत समावेश असून या पिक विमा योजनेत सहभागासाठी पिक विमा पोर्टल १ जुलै २०२३ पासून कार्यान्वित झाले आहे. या योजनेत सहभागासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे.

 

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ पासून सदर योजना फक्त रक्कम एक रुपयात शेतकरी हिस्सा भरून सर्वसमावेशक पिक विमा योजना म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात भात व नाचणी ही पिके सदर योजनेतर्गत अधिसूचित आहेत. भात व नाचणी पिकासाठी निर्धारित केलेल्या विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्श्याच्या अनुक्रमे रक्कम १०३५.२० रु. व रक्कम ४०० रु.पैकी रक्कम एक रुपया भरून शेतकऱ्यास विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. उर्वरित शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

 

सदर योजनेतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तरः ७० टक्के इतका आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षातील सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर विचारात घेवून निश्चित केले जाते.

 

विमा संरक्षणाच्या बाबी

 

· पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट.

 

· प्रतिकूल हवामान घटकांमुळे पिक पेरणी/लावणी/उगवण न होणे.

 

· हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे (पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीं) झालेले नुकसान.

 

· काढणी पश्चात चक्रीवादळ, गारपीट, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे झालेले नुकसान.

 

·स्थानिक नैसर्गिक आपत्ती – विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी.

 

·नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा अँप, संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.

 

· संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उ

संबंधित पोस्ट

इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज -माजी राज्यमंत्रीअर्जून खोतकर

vishwatmaklokswamivarta

GSTR-3B रिटर्न भरण्यासाठी 21 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्ती संदर्भात पालकमंत्री यांनी घेतला आढावा; प्रशासनाला तत्काळ मदतीचे निर्देश– ना. मकरंद पाटील

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी..

vishwatmaklokswamivarta