vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना लाभासाठीअर्ज करण्याचे आवाहन

पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना लाभासाठीअर्ज करण्याचे आवाहन

 

 

             सांगली प्रतिनिधी: राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्धवारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगलीच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना रक्कम 43 हजार रुपये रक्कम लाभ म्हणून वितरीत केली जाणार आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकामी तात्काळ अर्ज सादर करावेत. या योजनेचे अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचे कार्यालय सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती भांबुरे यांनी केले आहे.

 

 

 

00000

संबंधित पोस्ट

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

धुळे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुकमार्गात दि.९ ते २० दरम्यान बदल

vishwatmaklokswamivarta

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी- मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत