vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आजपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी …

आजपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी …

 

मंत्रालय प्रतिनिधी

शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे

सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या कारवाईला वेग आला आहे.

शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने तात्काळ एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी उपाध्यक्षांकडे अर्ज केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या 40 आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला. शिंदे गटाने आदित्य ठाकरे वगळता ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. अशा प्रकारे 54 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय प्रलंबित आहे

संबंधित पोस्ट

चंद्रयान 3 आज गाठणार नवा टप्पा; महत्त्वाची महिती देत इस्रोनं काय म्हटलंय एकदा पाहाच…

vishwatmaklokswamivarta

सनातन धर्माला संपवण्याविषयी ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही?सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार ! हिंदू जनजागृती समिती

केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत…केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल – मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद देत माहिती

vishwatmaklokswamivarta

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन