vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस अनेक ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य संग्राम सैनिक, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.

महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राने सामाजिक-आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपले राज्य उद्योग, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि संस्कृती क्षेत्रांत आघाडीवर आहे.

समृद्ध आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास वाटतो. देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी एकजूट होऊया आणि स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे आदर्श पुढील पिढ्यांसाठी कायम ठेवूया”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यपालांचे झेंडावंदन पुणे येथेएकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन शुक्रवारी (दि. १५) सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पुणे येथील विधान भवनाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावुन मानवंदना देणार आहेत.परंपरेनुसार स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपालांनी सायंकाळी राजभवन, पुणे येथे निमंत्रितांसाठी चहापानाचे देखील आयोजन केले आहे.

संबंधित पोस्ट

ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी काम्या कार्तिकेयन हिनं रचला नवा इतिहास. 

vishwatmaklokswamivarta

डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील वधु वर मेळावा संपन्न…

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta