vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

 

सातारा प्रतिनिधी शासनाने 18 एप्रिल २०२३ पासून रोजी विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी एक लाख रुपये संरक्षण देण्यात येत आहे.

 

सातारा जिल्ह्यातील दि. 18 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2023 या कालवधीतील 54 प्रस्ताव शासनाने नुकतेच मंजूर केले असून 1 कोटी 8 लाख रुपये इतकी रक्कम संबंधित दावेदार यांच्या बँक खाती नुकतीच जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

 

सातारा तालुका- मंजूर दावे – 9, जमा रक्कम- १८ लाख रुपये, कोरेगांव तालुका- मंजूर दावे- 13, जमा रक्कम- 26 लाख रुपये, खटाव तालुका- मंजूर दावे -4, जमा रक्कम-8 लाख रुपये, कराड तालुका- मंजूर दावे – 4, जमा रक्कम-8 लाख रुपये, पाटण तालुका- मंजूर दावे – 3, जमा रक्कम-6 लाख रुपये, वाई तालुका-मंजूर दावे -2, जमा रक्कम-4 लाख रुपये, जावली तालुका- मंजूर दावे -5, जमा रक्कम-10 लाख रुपये, महाबळेश्वर तालुका- मंजूर दावे – 4, जमा रक्कम-8 लाख रुपये, खंडाळा तालुका- मंजूर दावे – 5, जमा रक्कम-10 लाख रुपये, फलटण तालुका- मंजूर दावे – 3, जमा रक्कम-6 लाख रुपये, माण तालुका- मंजूर दावे – 2, जमा रक्कम-4 लाख रुपये, एकुण 54 दावे व 1 कोटी 08 लाख रुपये जमा रक्कम अशी आहे.

 

यापूर्वी शेतकरी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेनं वेगळी विमा योजना केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध राहणार नाही. या योजनेतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासासाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत शेतकऱ्याचा केव्हाही अपघात झाला तरी तो विमा योजनेतर्गत लाभासाठी पात्र राहील.

 

 

 

या योजनेंतर्गत ग्राह्य अपघातांचे प्रकार- रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदश/ विंचूदंश, बाळतपणातील मृत्यू, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने हल्ल्यामुळे जखमी/ मृत्यू. जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, दंगल, अन्य कोणतेही अपघात, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

 

दि. 18 एप्रिल 2023 अथवा त्यानंतर अपघात झाला असल्यास पात्र शेतकरी / वारसांनी आपले कार्यक्षेत्रातील कृषि पर्यवेक्षक अथवा तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून त्यांचेमार्फत प्रस्ताव सादर करणेचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलातील अधिकारी पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांनी कामाच्या ठेक्यासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक 

vishwatmaklokswamivarta

बॉयलर इंडिया- 2024 नवीमुंबईत तीन दिवस प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

पेन्शन आता ई- कुबेर मार्फत’;पेन्शधारकांनी खाते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावे- कोषागार विभागाचे आवाहन