vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पेन्शन आता ई- कुबेर मार्फत’;पेन्शधारकांनी खाते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावे- कोषागार विभागाचे आवाहन

पेन्शन आता ई- कुबेर मार्फत’;पेन्शधारकांनी खाते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावे- कोषागार विभागाचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- सेवानिवृत्त वेतनधारकांचे सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) हे आता शासनाच्या ई- कुबेर प्रणालीद्वारे रिझर्व बॅंकेमार्फत पेन्शनधारकांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. तथापि, त्यासाठी पेन्शनधारकांनी आपले बॅंक खाते परस्पर न बदलता ते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावे,असे आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या सहा. संचालक श्रीमती सुषमा बुरकुले यांनी केले आहे.

 

यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे की, पेन्शनधारकांनी आपली पेन्शन जमा होण्यासाठी ज्या बॅंकेत खाते सुरु केले असेल त्या खात्यात आय.एफ.एस.सी. कोड नुसारच पेन्शन जमा होणार आहे. तथापि, काही पेन्शनधारक हे कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता बॅंक खाते हे परस्पर अथवा अन्य जिल्ह्यात वा बॅंकेत बदलवून घेतात. तरी पेन्शधारकांनी आपले खाते ज्या मुळ बॅंकेत होते त्याच बॅंकेत ठेवावे. परस्पर बदल करुन पेन्शन बाबत अडचण निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या पेन्शनधारकाची असेल. मार्च महिन्याचे मासिक पेन्शन हे दि. ५ एप्रिल पर्यंत जमा होईल,असेही श्रीमती बुरकुले यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ 

प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई,खंडपीठ औरंगाबाद येथे आज(दि.७) लोकअदालत

vishwatmaklokswamivarta

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे शहरी भागात बचत गटांची संख्या वाढवावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा होणार कायापालटकोयना परिसर पर्यटनाचे हब होणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई..