
*खंडग्रास चंद्रग्रहण*अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर..
2023 शनिवार
आध्यात्मिक
*ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५**ग्रहण मध्य – रात्री ०१:४४*
*ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३**ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट*हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.*ग्रहणाचा वेध*- शनिवार दि.28ऑक्टोबर2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत. *बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१ पासुन वेध पाळावेत.*
वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
*ग्रहकाळात म्हणजे रात्री ०१:०५ ते ०२:२३ या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग हे करु नयेत.*
*ग्रहणातील कृत्ये*- ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा,तर्पन,श्राद्ध जप,होम,दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.ग्रहण काळामध्ये झोप,मलमूत्रोत्सर्ग,अभ्यंग,भोजन व कामविषयसेवन हे कर्म करू नये. सुतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते.
*कोजागरी आणि ग्रहण*
यावर्षी दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असुन रात्री ०१:०५ ते ०२:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. *त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल* मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल.
शुभम भवतू
दाते पंचांग🙏
*श्री आदेश जंगम (स्वामी गुरुजीं )* धायरीकर
मोबा:- 8788086003



