
भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ नेव्ही कडून जारी; सिंधुदुर्गात आज सेलिब्रेशन…
राज्य प्रतिनिधी
आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेव्ही डे 2023 साजरा केला जात आहे. संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून लाईव्ह स्ट्रिमिंग नेव्हीच्या युट्युब चॅनल वर उपलब्ध आहे.
भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ Navy कडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपतींच्या दूरदृष्टीचा दाखला देण्यात आला आहे. शिवरायांनी स्वराज्य परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जसं आरमार उभारलं होतं तशीच आता देशाच्या सुरक्षेसाठी नौसेनेचे जवान सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेव्ही डे 2023 साजरा केला जात आहे. संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून लाईव्ह स्ट्रिमिंग नेव्हीच्या युट्युब चॅनल वर उपलब्ध आहे.



