vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचे वाटप,उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रेजिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचे वाटप,उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रेजिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी :- शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना काल दि.13 डिसेंबर 2023 रोजी भूखंडाचे वाटप करण्यात आले. 1967 साली भातसा प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला होता. मात्र त्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठीची मागणी होती. त्याप्रमाणे त्यांना भातसा नगर येथे 97 भूखंड पाडण्यात येऊन त्या भूखंडाचे हस्तांतरण आज दि. 13 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीम.रेवती गायकर यांनी दिली आहे.

 

या 97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना काल दि. 13 डिसेंबर 2023 रोजी भूखंडाचे प्रत्यक्ष ताबे देण्यात आले. इतर प्रकल्पग्रस्त मयत असून त्यांचे वारस तपास काम सुरू आहे . मात्र त्यांचे वारस सापडत नसल्याने भूखंड वाटपास विलंब होत आहे. तरी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मूळ मयत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांच्या नोंदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीम.रेवती गायकर यांनी केले आहे.

 

0000000000

 

वृत्त क्र.982/2023

संबंधित पोस्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने खासदार राहुल शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

महापौर निवडणूक : दिल्ली महापालिकेत मध्यरात्री राडा, भाजप-आपचे नगरसेवक भिडले…

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा-नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जालना जिल्‍ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा· परीक्षेदरम्‍यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्‍हा दाखल होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा 

vishwatmaklokswamivarta

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta