vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा 

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

जालना, प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 या आर्थिक वर्षातील योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना कळविलेल्या आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच कार्यालयीन यंत्रणांनी तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव सादर केले नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. तरी संबंधित यंत्रणांनी तांत्रिक मान्यता तत्परतेने घेवून, तसेच प्रशासकीय मान्यता घेवून कामे विहीत मुदतीत पुर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात आज जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष 2025-26 करीता आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेताना विविध कामांच्या प्रगतीचा, खर्चाच्या स्थितीचा आणि मंजूर निधीच्या वापराचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यांनी संबंधित शासकीय विभागांना मंजूर निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभागाने मंजूर निधी आर्थिक वर्षातच खर्च करावा, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता त्वरीत मिळवावी, तसेच कामांची गुणवत्ताही चांगल्या प्रतीची असावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.

यावेळी वन विभाग, कौशल्य विभाग, क्रीडा विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, उर्जा विभाग, उद्योग विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य पुरातत्व विभाग, कारागृह विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, नगरपालिका प्रशासन विभाग, सिंचन विभाग, आणि रस्ते विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता बाबत सविस्तर आढावा घेवून विविध सुचना करण्यात आल्या. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 नियोजनाबाबत दायित्व वजा जाता दीडपट प्रशासकीय मान्यता/प्रस्ताव आदीचा आढावा घेण्यात आला.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल

vishwatmaklokswamivarta

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेषसरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेष

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई