vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

 

जालना, प्रतिनिधी) :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल दि. 3 डिसेंबर 2023 रोजी तयार करण्यात आले आहे. तरी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.

 

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरुन सुरु आहे. योजनेचा उद्देश – दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

शिराळा, जत, विटा येथे सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना ई समृध्दी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण  करणाऱ्याअंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महसूल विभाग संबंधित कामाचा लाभ घेण्याचे आवाहन15 ऑगस्टपर्यंत महसूल दिनानिमित्त जालना जिल्ह्यात विविध शिबीरासह उपक्रमाचे आयोजन

कार्यकारी अभियंत्याला शिवसैनिकांचा घेराव वीज ग्राहकांना दिलेली जास्तीची बिले तातडीने रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर कार्यकारी अभियंत्यांना विजेच्या प्रश्नांवरून घेराव स्मार्ट मीटर बसविण्याची योजना खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी.