vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

 

[ राज्य प्रतिनिधी: मराठा-कुणबी दाखल्यासाठी समितीचे काम सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी काम करत आहेत. मात्र, कनिष्ठ अधिकारी नोंदीच देत नाहीत. मग त्या समितीचा उपयोग काय, असा थेट सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. जरांगे पाटील यांनी सगेसोयरे हा शब्द अंतर्भाव करण्याची मागणी केली.

 

मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीची बैठक पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगवर चर्चा केली. त्यावेळी जरांगे यांनी आग्रही भूमिका मांडली.

 

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटले की, उपोषण सोडले त्यावेळी ज्या गोष्टी ठरल्या होत्या. तुमचा शब्द अंतिम मानला आणि उपोषण सोडले. ज्याची नोंदी सापडल्या त्याच्या पूर्ण परिवाराला आरक्षण द्यावे. ज्याची नोंद सापडली त्याचे नातेवाईक आणि सगे सोयरे असे ठरले होते. त्र्यंबकेश्वर ते काळाराम मंदिर, भाट यांच्या नोंदी घ्या आम्ही म्हणालो होतो.

 

तुमच्या शब्दाखातर 7 महिने दिले आहेत. 20 तारखेच्या आता द्या ही विनंती करत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. मराठवाड्यामध्ये नोंदी तपासल्या गेल्या नाहीत. समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत. शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहे असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

 

संबंधित पोस्ट

श्रीगणरायाच्या आगमनापूर्वी खड्डे दुरुस्तीसह रस्ता सुधारणा कामाला वेग..

vishwatmaklokswamivarta

पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार,एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनात बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांचा बचाव…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगड किल्ल्यावर येणार….

vishwatmaklokswamivarta

३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड.आशिष शेलार आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची ‘दीप उत्सव दिवाळी पहाट’

vishwatmaklokswamivarta

दहीहंडी पथकातील गोविंदाचा मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार १० लाख; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा