vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

 

[ राज्य प्रतिनिधी: मराठा-कुणबी दाखल्यासाठी समितीचे काम सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी काम करत आहेत. मात्र, कनिष्ठ अधिकारी नोंदीच देत नाहीत. मग त्या समितीचा उपयोग काय, असा थेट सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. जरांगे पाटील यांनी सगेसोयरे हा शब्द अंतर्भाव करण्याची मागणी केली.

 

मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीची बैठक पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगवर चर्चा केली. त्यावेळी जरांगे यांनी आग्रही भूमिका मांडली.

 

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटले की, उपोषण सोडले त्यावेळी ज्या गोष्टी ठरल्या होत्या. तुमचा शब्द अंतिम मानला आणि उपोषण सोडले. ज्याची नोंदी सापडल्या त्याच्या पूर्ण परिवाराला आरक्षण द्यावे. ज्याची नोंद सापडली त्याचे नातेवाईक आणि सगे सोयरे असे ठरले होते. त्र्यंबकेश्वर ते काळाराम मंदिर, भाट यांच्या नोंदी घ्या आम्ही म्हणालो होतो.

 

तुमच्या शब्दाखातर 7 महिने दिले आहेत. 20 तारखेच्या आता द्या ही विनंती करत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. मराठवाड्यामध्ये नोंदी तपासल्या गेल्या नाहीत. समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत. शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहे असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

 

संबंधित पोस्ट

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

जागतिक मृद दिन -विशेष लेख- चला माती परीक्षण करुया, आपली जमीन समृद्ध करुया!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्याप संपलेला नाही. आंदोलनामुळे एसटी कामगार कामावर न परतल्यानं प्रवाश्यांची मोठी गैरसोय, आजही एकही बस नाही. पुण्यातील डेपोबाहेर आंदोलन सुरूच

vishwatmaklokswamivarta

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री नृसिंहाचे दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta