vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित,जिल्हा कार्यालय, ठाणे यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित,जिल्हा कार्यालय, ठाणे यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन

 

ठाणे, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयामार्फत चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) इ. व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा कार्यालय ठाणे यांच्या मार्फत दि.06 फेब्रुवारी 2024 रोजी ठिकाण टाऊन हॉल जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, कोर्टनाका ठाणे येथे सकाळी 10.30 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते होणार असून लिड कॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.

 

या कार्यशाळेमध्ये चर्मकार समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तसेच एम.सी.ई.डी यांच मार्फत जिल्हा प्रकल्प अधिकारी उद्योजकता प्रशिक्षणाची माहिती देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त चर्मकार बांधवांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचेमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज घेण्यास सुरवात

गटाशिक्षण आधिकारी पंस. चिखली श्री रमेश रतन डुकरे पाटिल यांना व त्यांना वाचविण्याऱ्या दोषी आधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई कराआमदार प्रशांत बंब