
17 व 18 फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय महारोजगार मेळावा विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदविण्यासाठी तर बेरोजगार युवक/युवतींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.29 जानेवारी 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये दि.17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागीयस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अतिरक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जी.जी.गोडेपुरे, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त बाबासाहेब राजले, कल्याण डोंबिवली उपायुक्त स्वाती देशपांडे, भिवंडी महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रणाली घोंगे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सुनील पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सहायक आयुक्त कामगार चेतन जगताप, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र श्रीमती सीमा पवार, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरंग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेश जाधव, कार्यकारी अभियंता सा.बां. विद्युत संजय पुजारी, सहसंचालक उद्योग विभाग कोकण विभाग नवी मुंबई श्रीमती विजू शिरसाट, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, दि.17 व 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये नमो महारोजगार कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे. हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
[05/02, 7:43 pm] Swamiji: नमो महारोजगार मेळाव्याकरिता 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत 13 आस्थापनेतर्फे 2 हजार 603 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली असून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी/महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी/व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
या माध्यमातून 1 लाख 50 हजार युवक/युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते शेवटी म्हणाले.
00000



