vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार,राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार,राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री रायगड जिल्ह्यातील 4 उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान

 

 

 

रायगड प्रतिनिधी:- उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

 

वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मे.नाईक ओशियनिक एक्सपोर्टस् प्रा.लि., एम,5,एमआयडीसी,तळोजा,मे. एच के एस एमपेक्स,प्लॉट नं3, पनवेल इंडस्ट्रीयल को-ऑप इस्टेट लि., नवी मुंबई फायनरी, मे.गंधार ऑईल फायनरी (इंडिया), टी-10, एम.आय.डी.सी. तळोजा ता. पनवेल, मे. कपुर ग्लास इंडिया प्रा. लि.,200/201/212, जवाहर को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट,कामोठे, पनवेल या घटकांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून ते म्हणाले, पुरस्काराला अन्ययसाधारण महत्व असून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा आदर्श घेऊन राज्यातील इतरांनी उद्योग उभारले पाहिजे, त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा पुरस्कार देण्यामागचा हेतू असतो. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी उद्योजकांची समिती गठीत करण्याची सूचना केली. पुरस्काराचे प्रस्ताव समितीकडे देण्यात यावे, प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीच्या प्राप्त सूचना विचारात घेऊन आगामी काळात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, असेही उद्योग मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले

 

०००००००

संबंधित पोस्ट

विधानसभा निवडणूक : आज २२ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन स्विकारणार

vishwatmaklokswamivarta

 राज्यातील या मोठ्या प्रकल्पाला मान्यता, तीन जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार चालना..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये· 2018 नंतर प्रथमच जाणार· पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर..

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तान ने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे ते पहा

vishwatmaklokswamivarta

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टल प्रशिक्षणाचे दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजन…