vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये· 2018 नंतर प्रथमच जाणार· पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 दावोसमध्ये· 2018 नंतर प्रथमच जाणार· पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर..

 

राज्य प्रतिनिधी ‘मुंबई, : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्‍यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.

डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

महाराष्ट्राने विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली आहेत, त्याबाबत सुद्धा ते विविध व्यावसायिक बैठकांमध्ये अवगत करतील आणि त्यातून महाराष्ट्राच्या एकूणच सर्वांगिण विकासाला चालना देतील.

समतोल विकासावर भर : देवेंद्र फडणवीसराज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौऱ्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.0000

संबंधित पोस्ट

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ 2.0 कार्यान्वित;जनतेसाठी अधिक सोयीस्कर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ  सप्ताहात शेवटच्या घटकांपर्यंत लाभ द्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ ! राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा ! – सनातन संस्थेचे आवाहन

सैन्यदल, नौदल, वायुदल भरतीपूर्व निःशूल्क प्रशिक्षण

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार

vishwatmaklokswamivarta