
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टल प्रशिक्षणाचे दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजन…
ठाणे,(जिमाका) :- केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपद्धती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास १.उद्योग, उर्जा व कामगार विभाग कडील शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०१६/प्र.क्र.२१५/उद्योग-४.दि.२४ऑगस्ट२०१७.२.क्र.उस/भां.ख./जेमपोर्टलप्रशिक्षण/२०२४/सी-७३८३,दि.२६ जुलै २०२४ या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.
यानुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये GeM प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता दि.०५ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे GeM प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेकरिता सर्व संबंधित शासकीय खरेदी अधिकारी / कर्मचारी यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.
शासन निर्णयानुसार GeM पोर्टलचा अधिकाधिक वापर करून पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग व स्वायत्त संस्था यांना बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार GeM पोर्टलचा वापर अधिक कार्यक्षमतेने करून GeM पोर्टलवरून होणारी खरेदी दुप्पटीने वाढविण्याबाबत सूचित केले आहे. सन २०२३-२४ मध्ये राज्यामध्ये GeM पोर्टलवरून एकूण झालेली खरेदीच्या स्वरूपात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात GeM पोर्टलवरून होणाऱ्या खरेदीबाबत रु.१२ हजार कोटी उद्दिष्ट प्राप्त झालेले असून तेवढ्या प्रमाणात खरेदी अभिप्रेत आहे.
उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि.१४ मार्च २०२३ च्या पत्रान्वये सुधारित खरेदी धोरणातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दि.०७ मार्च २०२४ अन्वये GeM Portal वर उपलब्ध असणाऱ्या वस्तू व सेवांची खरेदी बंधनकारक करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये GeM प्रणालीचा प्रचार, प्रसिद्धी व व्याप्ती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने, ठाणे जिल्हयासाठी GeM प्रचार व प्रसिध्दी आराखडा GeM प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून तयार करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी दिली आहे.
00000000000



